Water Innovations – “गोदावरी आरती” उपक्रम

गोदावरी जन्मोत्सवाचे औचित्य साधत संकेतस्थळाचे लोकार्पण

गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण. 

जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. त्यांना मूलभूत समस्यांकडे आकृष्ट करायचे असल्यास प्रत्येकाच्या सामायिक आस्थेचा विषय निवडून जगभरातील तरुणांना हाक दिली पाहिजे या उद्देशाने नाशिक मधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय २२ राजभाषा शब्दकोशकार श्री सुनील खांडबहाले यांनी गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या वेबसाईटची निर्मिती केली आहे. 

साहित्य, कला-संगीत यामध्ये प्रत्येकासच साद घालण्याची क्षमता असल्याचे ओळखून या वेबसाईटवर माता गोदावरीची भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महती गाणारी “गोदावरी आरती” आधुनिक काळातहि नवतरुणांना सहज समजेल अशा पद्धतीने त्यांनी शब्दबद्ध केली आहे. देववाणी संस्कृतप्रचुर शब्दांचा भावार्थ विषद केला आहे. साहित्यक व भाषीय दृष्टया आरती अक्षरगणवृत्तात छंदबद्ध करून ती संगीतबद्धदेखील केली आहे. इन्फोसिस तसेच ऍक्सेंचर अशा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उच्च्पदस्थ असलेल्या गुणी गायकांनी तसेच अनेक कलावंतानी गायलेली गोदावरी आरती वेबसाईटवर ऐकायला मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेबसाईटवर कराओके संगीत ट्रॅक देण्यात आला असून आपण प्रत्येकजण आपल्या आवाजात गोदावरी आरती रेकॉर्ड करून लगेच अपलोड व #godavariaarti हॅशटॅग वापरून शेअर करू शकतो. यामध्ये खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, संगीत कला-प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार व अन्य व्यावसायिक कलावंत अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेऊ शकतो. सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (व्होकल) किंवा वाद्य (इंस्ट्रुमेंटल) स्वरूपात, व्यक्तिगत, युगल किंवा सामूहिक पद्धतीने “गोदावरी आरती” रेकॉर्ड करता येते. सहभागाबद्दल डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे. 

।। गोदावरी आरती ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।

गोदावरी आरती ऐकण्यासाठी www.GodavariAarti.org या संकेतस्थळास भेट द्यावी. 

Leave a Reply0

Your email address will not be published.