Spirituality Projects

Online Dnyaneshwari (Audio-Visual) :

श्रीमद्भग्वद्गीतेवरील ज्ञानेश्वरी ही टीका वाचल्याने मूढ म्हणजेच जड बुद्धि असेल त्यालाही ज्ञान होते आणि जो मूर्ख असेल म्हणजे ज्ञान असूनही योग्यप्रकारे वापरत नाही त्यालाही योग्य ज्ञान होते. मनुष्याने आयुष्यात एकदातरी ज्ञानेश्वरी वाचवी व पंढरी पहावी. अज्ञानी मनुष्यालाही ज्ञान होइल असा त्या टीकेस वर आहे. https://dnyaneshwari.khandbahale.org/


Bhagvadgita (with Audio & Meaning) :

श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर केलेला तत्वचिंतनात्मक उपदेश. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो. मानवी जीवनात उत्पन्न होणा-या अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने हा गीता विचार अंगिकारला पाहिजे. जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथात आहे. https://bhagvadgita.khandbahale.org/


Haripath (with Audio) :

संत ज्ञानेश्वरांनी २८ मराठी अभंगांच्या रूपात हरिपाठ लिहिला आहे https://haripath.khandbahale.org/


Online Changdev Pasashti :

ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना जे पत्र लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. https://changdevpasashti.khandbahale.org/


Online Amrutanubhav (Anubhavamrut) :

अमृतानुभव अथवा अनुभवामृत अथवा अमृतानुभव ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ आहे. सदर ग्रंथाच्या उपसंहारात अनुभवामृत असा शब्द वापरलेला आहे. https://amrutanubhav.khandbahale.org/


Online Bhagvat (Eknathi) :

“एकनाथी भागवत” ही संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते. https://bhagvat.khandbahale.org/


Chiranjiv Pad (with meaning) :

“चिरंजीवपद” म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. https://chiranjivpad.khandbahale.org/


Panchadashi (with Meaning) :

पंचदश म्हणजे पंधरा. विवेक, दीप व आनंद अशी तीन मुख्य प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाचे पाच भाग आहेत. असे एकूण पंधरा भाग मिळून ह्मा ग्रंथाची रचना केली आहे. विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध विचारपूर्वक केलेली निवड. दीप म्हणजे विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश. आनंद हे ब्रह्माचे स्वरूप असून त्याचे प्रकार व साधने पंचदशीकार स्वामी श्री विद्यारण्यतीर्थ यांनी या ग्रंथात सांगितली आहेत. https://panchadashi.khandbahale.org/


Kōhaṃ? कोऽहम्? :

Kōhaṃ? Who Am I?’ Let’s understand it in simple words and with mindmap. कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात – सोप्या शब्दांत, नकाशांसह https://koham.khandbahale.org/