एकनाथी भागवत (अर्थासह) ऑनलाईन

https://bhagvat.khandbahale.org “एकनाथी भागवत” ही संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते.

Leave a Reply0

Your email address will not be published.